26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeगडचिरोली जिल्हा बंदची हाक; सृजनाक्काच्या हत्येच्या निषेधार्थ माओवाद्यांनी पेटवली 4 वाहनं

गडचिरोली जिल्हा बंदची हाक; सृजनाक्काच्या हत्येच्या निषेधार्थ माओवाद्यांनी पेटवली 4 वाहनं

एकमत ऑनलाईन

पोलिस उपनिरीक्षकासह एक कॉन्स्टेबल शहीद

गडचिरोली: जहाल महिला माओवादी सृजनाक्काच्या हत्येच्या निषेधार्थ माओवाद्यांनी आज (20 मे) गडचिरोली जिल्हा बंदची हाक दिली आहे. या दरम्यान दहशत पसरवण्यासाठी माओवाद्यांनी चार वाहनं जाळली आहेत. त्यात तीन हायवासह एका ट्रकचा समावेश आहे. चारही वाहने वाळू वाहतुकीच्या कामासाठी वापरण्यात येत होती.

90 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज
अलिकडेच माओवादी महिला नेता सृजनाक्का ही पोलिसांशी झालेल्या एका चकमकीत ठार झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज, 20 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदची घोषणा एक आठड्यापूर्वी केली होती. या बंदच्या पार्श्वभूमीवर सावरगाव पोलिस मदत केंद्राअंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर गजामेंढीजवळ त्रिशूल पॉईंटवर मध्यरात्री छत्तीसगडमधून वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रक आग लावून पेटवून दिल्या. यात 90 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Read More  अधिसूचना जारी : केंद्र सरकारी कार्यालयाच्या आवारात थुंकणे हा गुन्हा!

हल्ल्यासह जाळपोळ आणि एकूण 144 गुन्हे दाखल होते
दरम्यान, माओवाद्याच्या विभागीय समितीची सदस्य असलेली जहाल महिला माओवादी सृजनाक्का ही गेल्या आठवड्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाली होती. सी सिक्स्टी कमांडो पथकासोबत सिनभट्टीच्या जंगलात ही चकमक झाली होती. घटनास्थळी जहाल महिला माओवादी सृजनाक्काच्या मृतदेहासह एके 47 अत्याधुनिक बंदूक आणि इतर साहित्य जप्त करण्यात आली आहे. सृजनाक्कावर हत्या, पोलिस दलावर हल्ल्यासह जाळपोळ आणि एकूण 144 गुन्हे दाखल होते. कसनसूर आणि चातगाव या दोन दलमचे नेतृत्त्व सृजनक्काकडे होते.

माओवाद्यांना पोलिसांच्या दिशेने अंदाधूंद गोळीबार केला
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी माओवाद्यांच्या हल्ल्यात पोलिस उपनिरीक्षकासह एक पोलिस कॉन्स्टेबल शहीद झाले. याशिवाय तीन जवान जखमी झाले. भामरागड तालुक्यात कियरकोटीच्या जंगलात माओवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. गेल्या 15 दिवसांत माओवाद्यांकडून झालेला हा दुसरा हल्ला आहे.माओवाद्यांच्या विरोधात सर्च ऑपरेशन राबवणारे C-60 कमांडो जवान रविवारी सकाळी फसले होते. माओवाद्यांना पोलिसांच्या दिशेने अंदाधूंद गोळीबार केला. पोलिसांनी माओवाद्यांना जोरदार प्रतिउत्तर दिलं. मात्र, पोलीस उपनिरीक्षक धनाजी व्हनमाने आणि जवान किशोर आत्राम या दोघांना वीरमरण आलं. तर तीन जखमी झाले.

दसरु कुरचामी या जवानाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती
गोंगलू ओक्सा, राजू पुसली आणि दसरु कुरचामी अशी जवान जखमी झाले. दसरु कुरचामी या जवानाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. जखमी जवानांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहीद जवानांचे पार्थिव दुपारी दोन वाजता हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले.शहीद धनाजी होनमने हे पंढरपूर जिल्ह्यातील पुलूज येथील मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे. ते साडेतीन वर्षांपासून भामरागड येथील शीघ्र कृती दलात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. शहीद किशोर आत्राम हे भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील रहिवासी होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या