22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeमहाराष्ट्रगडचिरोलीत पूर

गडचिरोलीत पूर

एकमत ऑनलाईन

नागपूर : गडचिरोलीसह विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळेच पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गडचिरोलीमध्ये तीन दिवसांचा रेड अ‍ॅलर्ट जारी केला आहे. पूर परिस्थितीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस सोमवारी गडचिरोलीत दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिला विदर्भ दौरा आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. आता ते मुख्यमंत्री म्हणून गडचिरोलीचा दौरा करीत आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयातून रवाना झाल्याची माहिती आहे. यामुळेच दुपारची एमएमआरडीएची बैठक रद्द करण्यात आली आहे.
मागील ४८ तासांपासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नद्यांना पूर आला आहे.

तर काही ठिकाणी झाडे आणि ट्रक वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे लागू केलेल्या रेड अ‍ॅलर्टमध्ये सरकारी कार्यालये आणि अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकाने आणि सेवा बंद राहणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी अतिमहत्त्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे, असे सांगण्यात आले आहे.

नदी, नाले व तलाव अशा ठिकाणी जाणे टाळा
गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा येथे वर्धा व वैनगंगा नदीचे पाणी एकत्र येऊन प्राणहितामधून गोदावरी नदीला मिळते. तसेच मेडिगट्टा बॅरेजमधून आठ लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग ७५ दरवाजांमधून सुरू आहे. त्यामुळे नदीकाठी पडलेल्या पावसाचे पाणी सहज नदीत जात नाही. त्यामुळे लहान-मोठे सर्व नाले तुडुंब वाहत आहेत. कोरची तालुक्यात एकाच दिवसात १८६ मिलिमीटर पाऊस झाला. अहेरी तालुक्यातही काल २७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नागरिकांनी नदी, नाले व तलाव अशा ठिकाणी जाणे टाळावे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या