22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeआंतरराष्ट्रीयविदेशातही रंगला गणेशोत्सव

विदेशातही रंगला गणेशोत्सव

एकमत ऑनलाईन

लागोस : आफ्रिकन देश असलेल्या नायजेरियात सार्वजनिक पद्धतीने भारतीय नागरिकांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली.
नायजेरियामधील लागोस शहरात महाराष्ट्र मंडळ रेसिडेन्शिअल असोसिएशन ऑफ नायजेरिया यांच्याकडून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. लागोसच्या राजाचा थाट वेगळाच आहे. तेथील मराठी माणसांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरवले आणि लागोस येथे गणरायाची प्रतिष्ठापना केली. तेथे रोज पूजन करून गणरायाचा जयघोष केला जातो. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात आणला. आता भारताबाहेरही गणेशोत्सव साजरा केला जात आहे.

लागोस येथील महाराष्ट्र मंडळ रेसिडेंशियल असोसिएशन ऑफ नायजेरिया यांनी मनोभावे गणरायाची मूर्ती आणून विधिवत पूजा केली. यावेळी नायजेरियात नोकरीनिमित्त असलेल्या मराठी बांधवांनी एकत्र येत आरतीही केली. आता दिवसेंदिवस परदेशात गणेशोत्सव अधिक लोकप्रिय होऊ लागला आहे. भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी त्याची नाळ ही नेहमीच त्याच्या मातीशी जोडलेली असते, याचे हे उत्तम उदाहण आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या