38.1 C
Latur
Tuesday, June 6, 2023
Homeआयसीसी अध्यक्षपदासाठी गांगुली योग्य उमेदवार: स्मीथ

आयसीसी अध्यक्षपदासाठी गांगुली योग्य उमेदवार: स्मीथ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: प्रशासकीय कारभारातील अनियमीतता आणि लोढा समितीच्या शिफारसींचं पालन करण्यासाठी केलेली दिरंगाई यावरुन सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर कारवाई करत, सर्वात श्रीमंत बोर्डावर क्रिकेट प्रशासकीय समितीची स्थापना केली. यानंतर काही वर्षांनी नवीन संविधानानुसार बीसीसीआयच्या निवडणूक पार पडल्या, ज्यात माजी कर्णधार सौरव गांगुलीकडे बीसीसीआयचे अध्यक्षपद सोपवण्यात आले. अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर गांगुलीने बीसीसीआयच्या कारभारात काही लक्षणीय बदल केले. सध्या कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत, सर्व क्रिकेट बोर्डांना आपले आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी बीसीसीआय आणि भारतीय संघाच्या दौ-यावर अवलंबून राहावे लागणार आहे. यादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाचे संचालक ग्रॅम स्मिथ यांनी सौरव गांगुली आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे म्हटले आहे.

Read More  रुग्णांनी वाढवली चिंता : घरातून बाहेर पडले नाही तरी 61 जण निघाले पॉझिटिव्ह

आयसीसीच्या अध्यक्षपदावर योग्य व्यक्तीने बसणे गरजेचे आहे़ कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला एका खमक्या नेतृत्वाची गरज लागणार आहे. त्यामुळे खेळ माहिती असणारा आणि सध्याच्या जमान्याशी जुळवून घेणारा व्यक्ती आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी योग्य ठरेल. गांगुलीसारखा व्यक्ती त्या पदावर बसला तर ते योग्य ठरेल. क्रिकेटसाठी ते फायदेशीर ठरेल, त्याला खेळाविषयी माहिती आहे. तो प्रचंड अनुभवी आहे आणि त्याच्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आदर आहे, असे स्मिथ याने सांगितले़

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या