28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रपरळमध्ये गॅस पाइपलाइनला आग; परिस्थिती आटोक्यात

परळमध्ये गॅस पाइपलाइनला आग; परिस्थिती आटोक्यात

एकमत ऑनलाईन

मुंबई: मुंबईत परळमध्ये गॅस पाइपलाइनला गळती झाली आहे. पेट्रोल पंपाजवळच ही घटना घडली आहे. अग्निशमक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आजूबाजूची सर्व दुकाने तातडीने बंद करण्यात आली असून परिस्थिती आटोक्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

महानगर गॅस पाइपलाइनमध्ये ही गळती झाली आहे. गॅस पाइपलाइन भूमिगत असल्याने जमिनीतून गॅस, आग आणि धूर निघत असल्याचे चित्र भयंकर होते. जमिनीतील पाइपलाइनचा माग घेत अग्निशमक दलाचे जवान त्यावर पाण्याचा फवारा मारत होते. मात्र एका ठिकाणी पाण्याचा मारा सुरु असताना दुस-या ठिकाणाहून धूर निघत होता. त्यामुळे गॅसपाइपलाइनला नेमकी कुठे गळती झाली आहे, ही गळती थांबवता येईल का, हे आव्हान सध्या अग्निशमक दलासमोर आहे.

परळ परिसरातील आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. अग्निशामक दलाच्या प्रयत्नांनी आग विझवण्यात आली आहे. मात्र गॅस पाइपलाइन ही भूमिगत असल्यामुळे त्यात नेमकी कुठे गळती झाली आहे, याचा शोध लागलेला नाही. पाइप लाइनला कुठे बिघाड झालाय, हे शोधण्यासाठी तात्पुरता या भागातील गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. महानगर पालिकेच्या अधिका-यांमार्फत ही गळतीची ठिकाणं शोधली जात आहेत. त्यावर लवकरात लवकर दुरूस्ती करून गॅसपुरवठा पुन्हा एकदा सुरु केला जाईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या