24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeउद्योगजगतगौतम अदानी जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

गौतम अदानी जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अदानी ग्रुपचे चेअरमन आणि भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे जगातील दुस-या क्रमांकवरील सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनिअर लिस्टनुसार ते दुस-या दुस-या क्रमांकावर विराजमान झाले आहेत. बर्नार्ड अर्नाल्ट यांना त्यांनी मागे टाकत त्यांची जागा घेतली आहे.

गौतम अदानी यांची निव्वळ संपत्ती ही १५३.९ बिलियन डॉलर इतकी आहे. तर अर्नाल्ट यांची निव्वळ संपत्ती १५३.७ बिलियन डॉलर आहे. फोर्ब्सच्या डेटानुसार अदानी हे आता केवळ अ‍ॅलन मस्क यांच्याच एक पाऊल मागे आहेत. मस्क यांची संपत्ती सर्वाधिक २७३.५ बिलियन डॉलर इतकी आहे. दरम्यान, भारताचे दुसरे एक उद्योगपती मुकेश अंबानी या यादीत आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांची निव्वल संपत्ती ९१.९ बिलियन डॉलर इतकी आहे.

अदानी ग्रुप भारतातील तिस-या क्रमांकाचा ग्रुप
गौतम अदानी हे पहिल्या पिढीतील उद्योजक आहेत. त्यांच्या अदानी समूहामध्ये ऊर्जा, बंदरे आणि लॉजिस्टिक्स, खाणकाम आणि संसाधने, गॅस, संरक्षण आणि एरोस्पेस आणि विमानतळ या व्यवसायांसह ७ सार्वजनिक उद्योगांचा समावेश आहे. अदानी समूह हा भारतातील तिसरा सर्वात मोठा समूह (रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा समूहानंतर) आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या