24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रगौतम अदानी बारामती दौ-यावर; रोहित पवारांकडून गाडीचे सारथ्य

गौतम अदानी बारामती दौ-यावर; रोहित पवारांकडून गाडीचे सारथ्य

एकमत ऑनलाईन

बारामती : दिग्गज उद्योगपती गौतम अदानी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती दौ-यावर आहेत. कृषी विज्ञान केंद्रात आयोजित एका कार्यक्रमानिमित्त गौतम अदानी बारामतीला आले आहेत.

यावेळी शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अदानी यांच्या गाडीचे सारथ्य केले.
राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन, टाटा ट्रस्ट आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने बारामतीत सायन्स अ‍ॅण्ड इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटरचे उद्घाटन आज होत आहे. त्यानिमित्त शरद पवार, रोहित पवार आणि गौतम अदानी एकत्र आले आहेत. शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.

देशातील श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी बारामती विमानतळावर दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी स्वागत केले. तसेच कार्यक्रमस्थळी रवाना होताना रोहित पवार यांनी अदानींच्या गाडीचे सारथ्य केल्याने चर्चांना उधाण आले. दरम्यान, कार्यक्रम आटोपल्यावर गौतम अदानी हे शरद पवार यांचे निवासस्थान असलेले गोविंदबाग येथेही जाणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या