24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमुलींचे ‘वन पीस’ घालत पोरांचा सोशल मीडियावर राडा..

मुलींचे ‘वन पीस’ घालत पोरांचा सोशल मीडियावर राडा..

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सोशल मीडियाच्या माध्यमातून जगात कुठे काय चाललेय हे एका सेकंदात बघायला मिळते. तसेच लोकांचे हटके व्हिडिओ किंवा फोटोज याच प्लॅटफॉर्मवरून व्हायरल होत कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचतात. असेच तीन मुलांचे मुलींच्या हॉट ड्रेसमधले फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यांचा हा स्वॅगही अनोखा दिसून येतोय.

तीन मुले हॉट वन पीसमध्ये मुलींच्याच स्टाईलमध्ये रस्त्यावर वॉक करत निघाले. यांचा स्वॅग मॉडेल मुलींनाही मागे टाकेल असा आहे. त्यामुळे त्यांचे हटके अंदाजातील हे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यांच्या स्लो मोशन व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रियाही उमटल्या आहेत.

लडकियों वाला स्वॅग म्हणत या तीन माणसांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. त्यांचा हा अंदाज अनेकांना आवडला असून त्यांच्या या भन्नाट व्हिडिओला सोशल मीडियावर मिलीयन व्यूज आले आहेत. ही मुले असली तरी त्यांच्या अदा आणि अंदाज बघाल तर मुलींपेक्षा कमी नाही. त्यामुळे अनेकांनी त्यांचे कौतुकही केलेले दिसते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या