25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयजर्मनीची भारत बायोटेकच्या लसीला मान्यता

जर्मनीची भारत बायोटेकच्या लसीला मान्यता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत बायोटेकच्या कोरोना लस, कोव्हॅक्सीनला जर्मनीने मान्यता दिली असून या मंजुरीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. त्यामुळे जर्मनीत जाणा-या भारतीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र, पूर्वीप्रमाणे १ जूनपासून भारतीयांना प्रवासापूर्वी लसीकरण प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही. विशेषत: प्रवासाच्या दृष्टीने ही मान्यता देण्यात आली आहे.

यापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने(डब्ल्यूएचओ) कोवॅक्सिनच्या पुरवठ्यावर बंदी घातली होती. याबाबत माहिती देताना जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, भारत बायोटेकने संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीद्वारे निर्मित कोरोना-१९ कोव्हॅक्सीनचा पुरवठा थांबवला आहे. उत्पादन सुविधांची तपासणी आणि सुधारणा करताना आढळून आलेले दोष दुरुस्त करता यावेत, यासाठी हे निर्बंध लादण्यात आले होते.

डब्ल्यूएचओच्या निर्णयानुसार, लस प्राप्त करणा-या देशांना योग्य कारवाई करण्यास सांगितले होते. परंतु, काय कारवाई केली जाईल हे सांगितले नाही. डब्ल्यूएचओने सांगितले की, ही लस प्रभावी आहे आणि तिच्या सुरक्षिततेबद्दल कोणतीही चिंता नाही. परंतु, निलंबनामुळे कोव्हॅक्सीनच्या पुरवठ्यात व्यत्यय येईल. १४ ते २२ मार्च दरम्यान डब्ल्यूएचओ पोस्ट इमर्जन्सी यूज लिस्टिंग तपासणीच्या निकालांना प्रतिसाद म्हणून हे निलंबन घेण्यात आले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या