26.6 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeक्रीडाजर्मनी हॉकी विश्वचषक २०२३ चा विजेता

जर्मनी हॉकी विश्वचषक २०२३ चा विजेता

एकमत ऑनलाईन

भूवनेश्वर : यंदा भारतात पार पडलेल्या हॉकी विश्वचषकात आज झालेल्या अंतिम सामन्यात जर्मनीने बेल्जियमला मात देत विश्वचषकावर नाव कोरले आहे. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात जर्मनीने अखेर पेनल्टी शूटआऊटमध्ये बेल्जियमला ५-४ च्या फरकाने मात दिली. दुसरीकडे भारतीय संघ क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत होऊन स्पर्धबाहेर झाला होता. पण वर्गीकरण सामन्यात भारताने चांगली कामगिरी करत ९ व्या स्थानावर स्पर्धा संपवली.

जर्मनी आणि बेल्जियम या दोन्ही संघानी स्पर्धेत सुरुवातीपासून दमदार कामगिरी करत फायनल गाठली होती. त्यामुळेच फायनलचा सामनाही अगदी अटीतटीचा झाला. भुवनेश्वरमध्ये खेळल्या गेलेल्या आजच्या अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी करत जर्मनीने तिस-यांदा विश्वचषक जिंकला आहे. फायनलचा सामना अतिशय रोमांचक झाला, फुल टाईमपर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी ३-३ गोल करत सामन्यात बरोबरी साधली होती. त्यानंतर विजेता कोण? हे ठरवण्यासाठी पेनल्टी शूटआऊट घेण्यात आले. पेनल्टी शूटआऊटमध्ये जर्मनीने बेल्जियमचा ५-४ अशा फरकाने पराभव करत आपला विजय पक्का केला आणि सोबतच विश्वचषकाची ट्रॉफी देखील उंचावली.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या