31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयविनाअनुदानीत सिलिंडरवर मिळवा सवलती

विनाअनुदानीत सिलिंडरवर मिळवा सवलती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : एलपीजी गॅस सिलिंडर देशातील अनेक घरांमध्ये आज वापरले जात आहे. मोदी सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गंत घराघरातील चुलींची जागा गॅसने घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. दरम्यान सरकारकडून गॅस सबसिडी देखील दिली जाते. या अनुदानाचे पैसे थेट ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा होतात. वर्षभरामध्ये एकूण १२ सबसिडी असणारे सिलिंडर मिळतात. अर्थात १२ पेक्षा जास्त सिलिंडर वापरल्यास तुम्हाला सबसिडी मिळणार नाही. दरम्यान सबसिडी नसणारे घरगुती गॅस सिलिंडर देखील तुम्ही चांगली सूट मिळवून खरेदी करू शकता.

कोरोना काळात डिजिटल पेमेंट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सरकार देखील डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देत आहे. दरम्यान या उद्देशासाठी तेल मार्केटिंग कंपन्या देखील ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर कॅशबॅक ऑफर करत आहेत, जेणेकरून ग्राहक अधिकाधिक पेमेंट ऑनलाईन करतील. यामध्ये हिंदूस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या तेल कंपन्या ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर चांगली सवलत देत आहेत.

कशी मिळेल सूट?
एलपीजी गॅसच्या किंमतीवर सवलत मिळवण्यासाठी जेव्हा तुम्ही पैसे भरणार असाल त्यावेळी कॅश पेमेंट करू नका. तर त्याऐवजी ऑनलाईन पेमेंटचा पर्याय निवडा. डिजिटल पेमेंट करताना तुम्ही यांसारखे प्लॅटफॉर्म वापरू शकता. यापैकी बहुतांश प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा ऑनलाईन पद्धतीने पैसे भरताना चांगला कॅशबॅक मिळतो.

ऑनलाईनमध्ये अनेक योजना
पेटीएम ग्राहकांना ५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक देत आहे. याशिवाय तुम्ही इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून केलेले पेमेंट यासांरख्या पर्यायांचा देखील वापर करू शकता. ऑनलाईन पेमेंटची खासियत म्हणजे तुम्ही घरबसल्या किंवा अगदी कुठेही असाल तरी पैसे भरू शकता. त्यामुळे गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरी वेळी घरामध्ये रोख रक्कम ठेवण्याचीही गरज भासत नाही.

यूपीएसीची तयारी करणा-या एसटीच्या उमेदवारास मिळणार आर्थिक साह्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या