26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रमध्यवधी निवडणुकीला तयार राहा : शरद पवार

मध्यवधी निवडणुकीला तयार राहा : शरद पवार

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात सध्या आलेले सरकार सहा महिन्यांत कोसळू शकते, त्यामुळे मध्यवर्ती निवडणूकीच्या तयारीला लागा, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना दिली आहे. शिंदे सरकारची सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.

आमदारांना मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले की, राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. हे सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. आपण विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडल तर मध्यावधी निवडणुका लागतील त्यामुळें तयारी आतापासून करा.

विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार ?
विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती विश्वनीय सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, हसन मुश्रीफ, अजित पवार, धनंजय मुंडे यांची बैठक झाली. यामध्ये अजित पवारांच्या नावावर एकमत झाल्याचं समजतेय. या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची शरद पवार यांच्यासोबतची बैठक काही वेळापूर्वी संपली. आमदारांकडून बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आलाय. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

आजच्या भाजप आणि शिवसेना बंडखोर आमदारांच्या बैठकीत काय झालं ?
भाजप आणि शिवसेना बंडखोर आमदारांची ताज प्रेसिडेंट हॉटेलला रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत सोमवारी होणाऱ्या बहूमत चाचणी संधर्भात चर्चा व आमदारांना मार्गदर्शन करण्यात आले. सोमवारी बहुमत चाचणीत कोणतीही चुकू नये यावर दोन्ही गटांच्या आमदारांना विशेष सूचना दिल्या गेल्या. या बैठकीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. आज विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सर्व आमदारांचे अभिनंदन ही या बैठकीत करण्यात आले. तसेच उद्या ही बहुमत सिद्ध होईल असा विश्वास दोन्हीं गटाच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. यांनतर दोन्ही गटातील आमदारांनी एकत्रित भोजन केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या