23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रलवकर बरे व्हा ; आव्हाडांनी केली राज ठाकरेंसाठी प्रार्थना

लवकर बरे व्हा ; आव्हाडांनी केली राज ठाकरेंसाठी प्रार्थना

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल दीड तास ही शस्त्रक्रिया चालली. राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती नुकतीच ट्विटरवरून त्यांनी दिली आहे.

दरम्यान, आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत लवकर बरे व्हा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
मंत्री आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. यात ते म्हणतात, राज ठाकरे आपल्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन आपण घरी परतला आहात.

आपण लवकरच पूर्णपणे बरे व्हाल ही आई भवानीकडे प्रार्थना! आपण मी कोरोना काळात आजारी असताना माझ्या कन्येकडे आस्थेने विचारपूस केली होती, हे मी विसरलेलो नाही. राजकारणात वाद असावेत द्वेष नाही.. असे म्हणत त्यांनी त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या