22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeराष्ट्रीय‘तूप तयार आहे’ दहशतवादी कोडवर्ड?

‘तूप तयार आहे’ दहशतवादी कोडवर्ड?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने दहशतवाद्यांकडून आर्थिक मदत घेतल्याच्या आरोपाखाली ४ जणांना अटक केली असून, ‘तूप तयार आहे’ अशा आशयाच्या चर्चेचा आधार घेत हे वाक्य म्हणजे दहशतवाद्यांमधील कोडवर्ड असल्याचा दावा केला. तूप म्हणजे स्फोटके आणि खिदमतचा अर्थ दहशतवाद्यांची मदत असल्याचे एनआयएचे म्हणणे होते. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयाने एनआयएने दावा करताना याबाबत कोणताही पुरावा सादर केला नसल्याचे निरीक्षण नोंदवले.

तसेच या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ४ जणांची निर्दोष सुटका केली.
एनआयएने मोहम्मद सलमान, मोहम्मद सलीम, आरिफ गुलाम बशीर धर्मपुरिया आणि मोहम्मद हुसेन मोलानी यांच्यावर पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेकडून आर्थिक मदत घेतल्याचा आरोप ठेवला. त्यांनी फलाह-ए-इंसानियत फाऊंडेशनकडून आर्थिक मदत घेऊन आरोपींनी भारतात स्लीपर सेल तयार केली. त्याचा वापर करून भारतात दहशतवाद पसरवला जातो आहे, असा आरोप केला.

एनआयएने म्हटले की, आरोपींनी एक मशिद बनवण्यासाठी दहशतवाद्यांकडून पैसे घेतले. मोहम्मद सलमानच्या फोनमध्ये दोन मेसेज मिळाले. यातील एका मेसेजमध्ये ‘तूपाची व्यवस्था झाली, मुंबईतली पार्टी देखील आली, त्यांच्या हस्ते पाठवून देऊ’ असा आशय होता.

‘तूप’ आणि ‘सेवा’ या शब्दांचे अनेक अर्थ : न्यायालय
दुस-या मेसेजमध्ये, ‘आम्ही तुमच्या सेवेत होतो त्यामुळे तुम्हाला याची माहिती नाही’ असा आशय होता. एनआयएने या शब्दांचा अर्थ दहशतवाद्यांना मदत केल्याचा काढून आरोपपत्रात या दोन्ही मेसेजचा समावेश केला होता. आरोपी या मेसेजमध्ये दहशतवाद्यांना मदत करण्याबाबत बोलत असल्याचा आरोप एनआयने केला होता. विशेष न्यायाधीश प्रवीण सिंह यांनी एनआयएला आपल्या आरोपांबाबत पुरावे सादर करता आले नसल्याचा नमूद केले. तसेच शब्दांचे अनेक अर्थ निघू शकतात. त्यामुळे एनआयएचे आरोप विनापुरावे स्वीकारता येणार नाही, असेही सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या