31.2 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeराष्ट्रीयमुली एवढे वाईट कपडे घालून बाहेर पडतात की त्या शूर्पणखा वाटतात

मुली एवढे वाईट कपडे घालून बाहेर पडतात की त्या शूर्पणखा वाटतात

एकमत ऑनलाईन

इंदूर : मुली एवढे घाणेरडे कपडे घालून बाहेर पडतात की, त्या बिल्कूल शूर्पणखा वाटतात, असे वादग्रस्त विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचा एक व्हीडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात ते मुलींना चांगले व योग्य कपडे घालण्याचा सल्ला देत आहेत. त्यांनी तरुणांतील वाढत्या व्यसनांधतेवरही संताप व्यक्त केला.

‘मी आजही बाहेर जातो तेव्हा सुशिक्षित तरुण-तरुणी नाचताना पाहून मला त्यांच्या थोबाडीत ५-६ द्याव्याशा वाटतात. असे केले तर त्यांची नशा उतरेल. खरे सांगतो, देवा शपथ. हनुमान जयंतीला मी खोटे बोलणार नाही. मुलीही खूप घाणेरडे कपडे घालून बाहेर पडतात…आपण महिलांना देवी म्हणतो. पण या मुलींमध्ये देवीचे रूप दिसत नाही. त्यात शूर्पणखा दिसते. खरेच देवाने त्यांना किती सुंदर शरीर दिले आहे. थोडे चांगले कपडे घाला. मुलांमध्ये संस्कार रुजवा. मला खूप काळजी वाटते.

विजयवर्गीय इंदूरच्या एअरपोर्ट रोडवरील महावीर बागेत एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी मुलींचे पेहराव व तरुणांमधील अमली पदार्थांच्या व्यसनावर चिंता व्यक्त केली.
भाजपला महिलांचा अवमान करण्याची सवय : काँग्रेस
दुसरीकडे, काँग्रेसने विजयवर्गीय यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे काँग्रेसचे मीडिया प्रभारी पीयुष बबेले यांनी ट्वीट केले की, मुली आता काय घालणार, हे भाजप ठरवेल. भाजपला महिलांचा अवमान करण्याची सवय आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या