27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeउस्मानाबादवीज द्या नाहीतर कार्यालयाला कुलूप लावू

वीज द्या नाहीतर कार्यालयाला कुलूप लावू

एकमत ऑनलाईन

कळंब : शहर व विशेषत: कसबा पेठ मधील मांजरा काठच्या शेतक-यांनी गांधीगिरी आंदोलन करत वीज महामंडळ कार्यालय कळंबचा भोंगळ कारभार उघडा केला.
सावरकर पुतळा मेन रोड कळंब येथे आज सकाळी हे सर्व पीडित शेतकरी एकत्र आले, भीक नको लाईट द्या, शेतकरी टिकेल तर पीक पिकेल, असे पोस्टर या शेतक-यांनी शहरातील मुख्य चौकात काल रात्रीच लावले होते.

सकाळीं शेतातील विजेअभावी सुकलेली साधारण १००० गुलाबाची फुले या शेतक-यांनी ट्रॅक्टर मध्ये आणली होती, सोबत गेले महिनाभर दिवस लाईट बंद असल्यामुळे शेतीवर किती भयंकर परिणाम झाला हे या वरून दिसत होते. रोडवरील प्रत्येक दुकानात व्यापा-याला तसेच वैयक्तिक कामासाठी बाहेर आलेल्या प्रत्येकाला, एक लाईट नसल्याने परिस्थितीचे झेरॉक्स व सुकलेले फुल देवून या शेतक-यांनी मेन रोड, होळकर चौक, शिवाजी चौक येथे आपले गा-हाणे जनतेच्या दरबारात मांडले.

होळकर चौकात संदीप शेंडगे या तरुण शेजा-यांची मोसंबीची बाग नुकसानीत गेली, शेतकरी विकत पाणी घेवुन जनावरें जगवत आहेत, कोथिंबीर, टरबूज काकडी, भाजीपाला कसा जळून गेला ही सगळी परिस्थिती सविस्तर मांडली. शिवाजी चौकात या आंदोलनास अजित पिंगळे तालुकाध्यक्ष भाजपा यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. संभाजी ब्रिगेडचे अतुल गायकवाड व तानाजी चौधरी यांनी आम्ही आक्रमक आंदोलन करू असा शब्द शेतक-यांना दिला.

या आंदोलनात तानाजी कदम, विश्वंभर भोसले, नाना कदम, नागनाथ घुले, दत्ता फाटक, रामभाऊ उपाडे ,विकास चोंदे, बळी जावले, अमजद काझी, दिलीप घुले, बालाजी चोंदे, रणजित घुले, दत्ता कसाब या शेतक-यांनी सहभाग घेतला. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी युवराज नकाते, राहूल चोंदे या तरुणांनी विशेष परिश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या