28.2 C
Latur
Friday, September 17, 2021
Homeमहाराष्ट्रमराठा समाजाला आरक्षण द्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर आंदोलन करणार

मराठा समाजाला आरक्षण द्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर आंदोलन करणार

एकमत ऑनलाईन

पंढरपूर : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. कोर्टातून आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. अशात मनसेने लोकल सुरू करण्याच्या मागणीनंतर मराठा समाज्याचा बाजूने आंदोलनाची हाक दिली आहे. मराठा आरक्षणासाठी मनसे मैदानात उतरणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

जागोजागी आंदोलन करण्यात येत आहे

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यभर आंदोलन करणार असा इशारा मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रेंनी दिला आहे. सोलापूर जिल्हा बंद आंदोलनात मनसे सक्रिय सहभाग घेतला आहे. पण जर आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर मनसे आक्रमक आंदोलन करणार असा इशारा मनसेकडून करण्यात आला आहे.राज्य सरकारच्या विरोधात जागोजागी आंदोलन करण्यात येत आहे. सोलापूरमध्ये तर पहिली जिल्हांबदीही करण्यात आली आहे.

आज सोलापूरच्या ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन

मराठा समाजाच्या संघटनांनी आज सोलापूर जिल्हा बंदची हाक दिली आहे. मात्र आज पहाटे पासून माढा, निमगाव पाटी इथं मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. इतकंच नाही तर पंढरपूर-पुणे मार्गही आंदोलकांनी रोखला आहे.मराठा आरक्षणास स्थगिती मिळाल्यानंतर समाज संतप्त झाला आहे. आज सोलापूरच्या ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन सकल मराठा समाजाने केला आहे. आज सकाळी पंढरपूर-पुणे मार्ग मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरला. निमगाव पाटी इथे टायर जाळून वाहतूक बंद केली आहे. आरक्षण प्रश्नी पंढरपूर माढा माळशिरस येथील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

आज पहाटे साडेपाच वाजताच टायर पेटवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला

माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज पहाटे साडेपाच वाजताच टायर पेटवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याभरात कडकडीत बंद पाळला जाण्याची शक्यता आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतरचा मराठा संघटनांनी पुकारलेला राज्यातील हा पहिलाच बंद असणार आहे. त्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरात कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे.

डिजिटल मीडिया विषारी द्वेष पसरवत आहे : केंद्र सरकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या