22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeमहाराष्ट्रछत्रपती संभाजीराजे यांना झेड प्लस सुरक्षा द्या - नाशिक मराठा क्रांती मोर्चाची...

छत्रपती संभाजीराजे यांना झेड प्लस सुरक्षा द्या – नाशिक मराठा क्रांती मोर्चाची मागणी

एकमत ऑनलाईन

नाशिक : संभाजीराजे छत्रपती यांनी मराठीतील दोन चित्रपटांविरुद्ध आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर राज्यभरात तणावाचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर चित्रपटसृष्टीवर माफिया अंडरवर्ल्डमधील गुंडांचा वरचष्मा असल्याने संभाजी राजेंना धोका निर्माण झाला असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी अशी नाशिक सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील इतिहासावर आधारित प्रदर्शित झालेल्या आणि प्रदर्शित होऊ पाहणा-या चित्रपटाविषयी राज्यात तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी शो बंद करण्यात आले. अनेक ठिकाणच्या चित्रपटगृहांत वादही पाहायला मिळाले.

या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी देखील या चित्रपटांविषयी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी संभाजी राजे छत्रपती यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहीत सुरक्षा वाढवून देण्याची मागणी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी छत्रपतींचे वारस संभाजी राजे यांनीही या चित्रपटाच्या निर्मितीवर आक्षेप घेऊन चित्रपट निर्मात्यांना इशारा दिला आहे. याबाबत नाशिक सकल मराठा क्रांती मोर्चाने एका पत्राद्वारे सुरक्षा वाढविण्याची मागणी केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, चित्रपटसृष्टीवर माफीया अंडरवर्ल्डमधील कुख्यात गुंडांचा वरचष्मा आहे.

त्यांच्या अजेंड्याला विरोध करणा-या मंडळीविरुद्ध प्राणघात कट रचून अमलातही आणले जातात. हा इतिहास नजरेसमोर असल्याने छत्रपतींच्या पराक्रमी इतिहासाचे विडंबन करण्यास विरोध करणारे संभाजीराजे यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

यामुळे छत्रपतींना सध्या असलेले वाय प्लस दर्जाच्या संरक्षणाऐवजी झेड प्लस संरक्षण देण्याची मागणी केली आहे.

त्याचबरोबर संभाजीराजे छत्रपती यांच्या विरोधात कुणी आवाज उठविण्याचा किंवा त्यांच्या जीवितास धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास गाठ आमच्याशी आहे, असा इशारा देखील सकल मराठा क्रांती मोर्चाने पत्रकाद्वारे दिला आहे.

त्यामुळे राजकीय वातावरण पाहता संभाजीराजे छत्रपती यांच्या सुरक्षेत वाढ करावी ही मराठा समाजाची मागणी मान्य करून उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत विचार करावा, अशी विनंती सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या