22.5 C
Latur
Saturday, November 26, 2022
Homeक्रीडाभारतीय क्रीडापटूंची सुवर्ण कमाई

भारतीय क्रीडापटूंची सुवर्ण कमाई

एकमत ऑनलाईन

आशियाई चॅम्पियनशीपमध्ये पदकांची लयलूट
नवी दिल्ली : जॉर्डनच्या अम्मान येथे सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतीय बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेनने ७५ किलो वजनी गटात, परवीन हुडा ६३ किलो वजनी गटात, सवेटीने ८१ किलो वजनी गटात आणि अल्फिया पठाणने ८१+ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. परवीनने जपानच्या किटो माईवर एकतर्फी विजय मिळवला. तिने ६३ किलो वजनी गटात किटो माईवर ५-० असा विजय मिळवला.

आशियाई स्पर्धा अथवा एशियाड ही दर ४ वर्षांनी आशियामधील देशांदरम्यान भरवली जाणारी एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे. या स्पर्धेचे आयोजन आशिया ऑंिलपिक समिती ही आंतरराष्ट्रीय ऑंिलपिक समितीची एक पाल्य संस्था करते. ऑंिलम्पिक खेळांखालोखाल आशियाई स्पर्धा ही जगातील दुस-या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे.

महिलांची जागतिक अजिंक्यपद
बॉक्सिंग स्पर्धा पुढील वर्षी भारतात
भारतात पुढच्या वर्षी महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. ही स्पर्धा नवी दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होण्याची शक्यता आहे. भारतात तिस-यांदा महिला जागतिक बॉक्स्ािंग चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यापूर्वी २००६ आणि २०१८ मध्ये नवी दिल्ली येथे महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन केले करण्यात आले होते. दोन वर्षापूर्वी जागतिक नियामक मंडळाला आवश्यक शुल्क न दिल्याने पुरुषांच्या स्पर्धेचे यजमान हक्क काढून घेतले होते. भारतात पुरुषांची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा कधीच आयोजित करण्यात आली नव्हती.

 

 

 

 

 

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या