हैद्राबाद : शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी अनेक भाविक सोनकिंवा पैस दान करतात. काही लोक ऑनलाइन पद्धतीनं दान करतात. तर काही लोक शिर्डीला जाऊन दान करतात. नुकतच हैद्राबादमधील एका भक्तानं चार किलो सोनं साईंच्या चरणी अर्पण केलं आहे. या सोन्याची सध्याचीकिंमत ही दोन कोटी आहे.
मंदिरीच्या ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असणा-या भाग्यश्री बानायत यांनी दिलेल्या माहितीनुसार, हैद्राबाद येथील पार्थ सारथी रेड्डी यांना २०१६ मध्ये साईबाबांच्या चरणी सोन्याची पट्टी दान करायची होती, परंतु त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही आणि नंतर कोविड-१९महामारीमुळे ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. त्यांनी आता श्री साईबाबांच्या मूर्तीच्या चौथ-यासाठी २ कोटी रुपयांच्या चार किलो सोन्यापासून बनवलेली नक्षीदार पट्टी दान केली आहे. मंगळवारी (१७ मंगळवार) विधीवत पूजा करुन भक्तानं दान केली हा सोन्याची पट्टी मूर्तीच्या चौथ-यासाठी बसवण्यात आली आहे.
भाग्यश्री बानायत यांनी पुढे सांगितले की, २००७ साली हैद्राबाद येथील आणखी एका भक्तानं साईबाबांना ९४ किलो सोन्यापासून तयार केलेले सिंहासन दान केले होते. ९ एप्रिल ते ११ एप्रिल दरम्यान यावर्षी शिर्डीमध्ये रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या दरम्यान ४ कोटी ५७ लाखांचे दान संस्थानला प्राप्त झाले असून या तीन दिवसात पावणे तीन लाख साईभक्तांनी साई दर्शन घेतले आहे.