35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home राष्ट्रीय 10 वी पास उमेदवारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसमध्ये 2834 पदांसाठी मेगा भरती

10 वी पास उमेदवारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसमध्ये 2834 पदांसाठी मेगा भरती

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय डाक विभागाच्या मध्य प्रदेश पोस्टल सर्कलमध्ये ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस) भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत पोस्टल विभागात 2834 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. या पदांवर दहावी उत्तीर्ण उमेदवारही अर्ज करु शकतात. ग्रामीण डाक सेवक यांच्या या भरती अंतर्गत शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टमास्टर, डाक सेवक यांची पदे भरली जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार 7 जुलै 2020 पर्यंत अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता
या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. यासह, 60 दिवसांचे मूलभूत संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र असले पाहिजे. त्याचबरोबर, ज्या उमेदवारांनी 10 वी किंवा 12 वी मध्ये संगणकाचा विषय म्हणून अभ्यास केला असेल, तर त्यांना मूलभूत संगणक प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.

Read More  लातूर जिल्ह्यात एक कोरोना पॉझिटिव्ह; तर एका व्यक्तीचा अहवाल प्रलंबित

वय मर्यादा
मध्य प्रदेश पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवकांच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असावे. त्याचबरोबर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा नियमानुसार शिथिल केली जाईल.

कशी होणार निवड ?
या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही, परंतु ऑनलाइन अर्जाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. दहावीच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

पगाराची माहिती
जीडीएस बीपीएमच्या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 12,000 ते 14,500 रुपये पगार मिळेल. तर जीडीएस एबीपीएमसाठी दरमहा 10,000 ते 12,000 रुपयांचा पगार दिला जाईल. दरम्यान, या भरती परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जुलै 2020 आहे. अधिक माहितीसाठी, आपण अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन माहिती मिळवू शकता.

Read More  दिल्लीत ३१ जुलैपर्यंत साडेपाच लाख रुग्ण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या