26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीय‘गोष्ट एका पैठणीची’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

‘गोष्ट एका पैठणीची’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयच्यावतीने यंदाचा ६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला असून ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. तर शास्त्रीय गायक राहूल देशपांंडे यांना सर्वोत्कृष्ट गायनाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली जात आहे. दरवर्षी हे पुरस्कार देशातील सर्वोत्कृष्ट निवडक चित्रपट आणि त्याच्याशी संबंधित कलाकारांना दिले जातात. आज दुपारी ४ वाजल्यापासून हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या कार्यक्रमात अनेक चित्रपट आणि कलाकारांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. ६८ वा चित्रपट राष्ट्रीय चित्रपट सोहळा नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात आला असून, त्यामध्ये कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येत आहे. यंदाचा ६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला असून ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या