24.8 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeराष्ट्रीयटिकटॉक,शेयर इट सह या ५९ ऍपवर सरकारची बंदी

टिकटॉक,शेयर इट सह या ५९ ऍपवर सरकारची बंदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने चीनला मोठा दणका दिला आहे. लोकप्रिय ऍप टिकटॉकसह 59 चिनी  ऍपवर मोदी सरकारने बंदी घातली आहे.  भारताच्या सार्वभौमत्व आणि एकात्मतेला धोका पोहोचवू शकतील किंवा देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता असलेली 59 चायनीज मोबाईल  ऍपवर बंदी घालायचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या चिनी  ऍप्सवर  बंधनं नव्हे तर बंदीच घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशवासीयांची सायबर स्पेस सुरक्षित राहावी, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

या 59 ऍप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर मोबाईल ऍप्स आणि इंटरनेट वापरताना कोणती काळजी घ्यावी, डाऊनलोड करताना कुठली माहिती द्यावी याबाबत भारत सरकारने निवेदन जारी केलं आहे.

बंदी घालण्यात आलेली ऍप्स

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या