24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रमनोधैर्य योजनेकडे शासनाचे दुर्लक्ष; चित्रा वाघ यांचा आरोप

मनोधैर्य योजनेकडे शासनाचे दुर्लक्ष; चित्रा वाघ यांचा आरोप

एकमत ऑनलाईन

पुणे : बलात्कारपीडित महिला तसेच लैंगिक छळाच्या प्रकरणातील अल्पवयीन मुलींना त्यांच्यासोबत घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा जीवनात उभारी घेता यावी, या उद्दिष्टाने महाराष्ट्र सरकार गेल्या अनेक वर्षांपासून मनोधैर्य योजना राबवीत आहे. मात्र गेल्या काही वर्षांत मनोधैर्य योजनेकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे का अशी शंका निर्माण झाल्याचे सांगत भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी यासंदर्भात आघाडी सरकारवर आरोप केले आहेत.

एका बाजूला बलात्कार तसेच लैंगिक छळाच्या घटना वाढत असताना वर्षागणिक मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून मदत निधी मिळवणा-या पीडित महिलांची आणि मुलींची संख्या सातत्याने कमी होत आहे. गेल्या काही वर्षांत मनोधैर्य योजनेमध्ये मदत मिळवून नव्याने जीवन सुरू करणा-या महिलांची संख्या लक्षात घेतली तर सातत्याने निधी मिळवणा-या पीडितांची संख्या खाली घसरत असल्याचे दिसून येते. वर्ष २०१४-१५ मध्ये मनोधैर्य योजनेत निधी मिळवणा-या महिलांची संख्या २ हजार ५०२ होती. ती वर्ष २०१९-२० पर्यंत ४६२ पर्यंत खाली आली आहे, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

निधी मिळवणा-या महिलांची संख्या कमीच
पोलिसांकडून मनोधैर्य योजनेसाठी निधी देण्यासंदर्भातले प्रस्ताव गेल्यानंतरही शासन पातळीवर निधी मिळत नव्हते असा त्यांचा आरोप आहे. दरम्यान चित्रा वाघ असा आरोप करत असल्या तरी २०१४ ते १९ दरम्यान फडणवीस सरकार सत्तेत असतानाही मनोधैर्य योजनेचा निधी आणि लाभ मिळवणा-या पीडित महिलांची संख्या सातत्याने कमी होत असल्याचे आकड्यांवरून दिसून येते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या