नवी दिल्ली : दिल्लीचे राज्यपाल अनिल बैजल यांनी आज आपल्या नायब राज्यपालपदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक कारण देत त्यांनी राजीनामा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. माजी सनदी अधिकारी अनिल बैजल यांनी ३१ डिसेंबर २०१६ रोजी दिल्लीच्या नायब राज्यपालपदाची सूत्रे हातात घेतली होती.
आता त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे सोपवला आहे. आता त्या ठिकाणी नव्या नायब राज्यपालांची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती आहे. अनिल बैजल यांनी ३१ डिसेंबर २०२१ रोजी आपल्या कार्यकालाची ५ वर्षे पूर्ण केली होती. त्यांच्या या कार्यकालाच्या दरम्यान त्यांचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी अनेकदा मतभेद झाले.