26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यपाल दोन दिवसांच्या दिल्ली दौ-यावर

राज्यपाल दोन दिवसांच्या दिल्ली दौ-यावर

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसीय दिल्ली दौ-यावर आहेत. राज्यपालांचा आज (२४ नोव्हेंबर) आणि उद्या (२५ नोव्हेंबर) दिल्ली दौरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भगतसिंह कोश्यारी यांना दिल्लीत पाचारण केल्याची चर्चा आहे.

यावेळी राज्यपाल नेमके कोणाला भेटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच भाजपचे केंद्रीय नेतृत्व महाराष्ट्राच्या राज्यपालांना पदमुक्त करण्याच्या दृष्टीने काही पावलं टाकणार का अशा चर्चांना उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२व्या दीक्षान्त समारंभ सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरींपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचे कोश्यारी म्हणाले होते.

यानंतर राज्यभर ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलने करण्यात आली. तसेच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार उदयराजे भोसले यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी राज्यपालांचा विरोध केला. उदयनराजेंनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या