19.2 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeमहाराष्ट्रराज्यपाल झाले भाज्यपाल... ; विरोधकांकडून घोषणा

राज्यपाल झाले भाज्यपाल… ; विरोधकांकडून घोषणा

एकमत ऑनलाईन

नागपूर : महाराष्ट्राचे एकच म्हणणे.. द्या हाकलून हे बुजगावणे.. राज्यपाल झाले भाज्यपाल, राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवा, चोर है चोर है राज्यपाल चोर है..अशी घोषणाबाजी करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विविध घोषणा देऊन विधानभवन परिसर दणाणून सोडला.

आंदोलनकर्त्यांनी हातात संघाच्या काळ्या टोप्या फिरवत महाराष्ट्राचे बुजगावणे त्वरित हाकला, अशी जोरदार मागणी केली. तसेच शेतकरी जसे शेतात बुजगावणे उभारतात तसेच विधानभवनाच्या पाय-यांवर बुजगावणे मांडून विरोधकांनी विधानभवनाच्या पाय-यांवर जोरदार आंदोलन करीत सत्ताधा-यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

बुजगावणे हे शेतमालाच्या संरक्षणाकरता शेतात उभारले जातात. पाखरांनी शेतमाल खाऊ नये असा त्यामागचा उद्देश असतो. राज्यातदेखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या रूपात दोन बुजगावणे आहेत. यांच्यासमोर गायरान खाल्ली जात आहे, भूखंड चोरले जात आहेत, महापुरुषांचा अवमान केला जात असून हे बुजगावणेरूपी सरकार गप्प बसले आहे, अशी खरमरीत टीका यावेळी विरोधकांनी केली.

आंदोलनकर्त्या आमदारांच्या घोषणाबाजीतून राज्यपालांबाबत आमदारांमध्ये किती असंतोष आहे हे दिसून येते. आंदोलन संपल्यानंतर त्या बुजगावण्याला लाथ मारून ते खाली पाडण्यात आले. या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार रोहित पवार, वैभव नाईक, विकास ठाकरे, वर्षा गायकवाड यांच्यासह सर्व आमदारांचा सहभाग होता.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या