27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमेडिकलच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी-अमित विलासराव देशमुख

मेडिकलच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी-अमित विलासराव देशमुख

एकमत ऑनलाईन

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांची राज्यपालांशी चर्चा

मुंबई : प्रतिनिधी
राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्तावित केलेल्या पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा आराखड्याला मंजूरी दिली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन राज्यपालांना आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे तयार करण्यात आलेला वैद्यकीय परीक्षा घेण्याबाबतचा विस्तृत आराखडा सादर केला. विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात केलेल्या नियोजनाचे यावेळी राज्यपालांनी कौतूक केले. राज्यपालांना दिलेल्या पत्रामध्ये अमित विलासराव देशमुख यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात तीन पर्याय तयार केले असल्याचे सांगि­तले.

Read More  मल्ल्याच्या भारत प्रत्यार्पणात कायदेशीर अडचणी

पहिल्या प्रस्तावानुसार परिस्थिती अनुकुल असल्यास सर्व लेखी परीक्षा १५ जुलै ते १५ आॅगस्­ट या कालावधीत घेण्यात येतील. कोरोनाच्या संकटामुळे या कालावधीत परीक्षा घेणे शक्य न झाल्यास लेखी परीक्षा १६ आॅगस्­ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येतील. उपरोक्त दोन्ही पर्यायांनुसार परीक्षा होऊ न शकल्यास आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे केंद्रीय वैद्यकीय परिषदेचे मार्गदर्शन घेण्यात येईल व त्यानुसार आॅनलाईन किंवा इतर पध्दतीने परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्यात घेतील.

आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे परीक्षांचा आराखडा तयार करताना सर्व संबधित घटकांशी, माजी कुलगुरू, प्रकुलगुरुंशी तसेच नियामक संस्थांशी विचारविनिमय केल्याचे अमित देशमुख यांनी राज्यपालांना सांगितले या संदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परिचर्या परिषद, वैद्यकीय परिषद तसेच इतर केंद्रीय संस्थाशीदेखील सल्लामसलत केल्याचे त्­यांनी सांगितले.आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रस्तावाला राज्यपालांनी दिलेल्या मंजुरीबाबत विद्यापीठाच्या कुलगुरूंनादेखील स्वतंत्रपणे कळविण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या