24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडाग्रामपंचायत निवडणूक : भाजपची सेंच्युरी, राष्ट्रवादीचेही अर्धशतक, शिवसेना मात्र बॅकफूटवर

ग्रामपंचायत निवडणूक : भाजपची सेंच्युरी, राष्ट्रवादीचेही अर्धशतक, शिवसेना मात्र बॅकफूटवर

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यामध्ये शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिली ग्रामपंचायत निवडणूक पार पडत आहे. एकूण ५४७ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजपने सेंच्युरी पूर्ण केली आहे. तर राष्ट्रवादीनेही ५८ जागा जिंकत अर्धशतक झळकावले आहे. काँग्रेस तिस-या स्थानावर असून शिवसेना आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

राज्यातील ६०८ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण १६ जिल्ह्यांतील ५४७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. ६०८ ग्रामपंचायतींपैकी ५१ जागा बिनविरोध झाल्या आहेत.

आतापर्यंत २७६ जागांचा निकाल हाती आला आहे. भाजप आणि शिंदे गटाने १२७ जागांवर बाजी मारली आहे. तर महाविकास आघाडीने आतापर्यंत ९८ जागांवर बाजी मारली आहे. पक्षनिहाय विचार केला तर, भाजपने १०४ जागा जिंकल्या आहेत. तर शिंदे गटाने २४ जागांवर बाजी मारली आहे.

महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीने सर्वाधिक ६० जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसने २३ आणि शिवसेनेने १७ जागा जिंकल्या आहेत. इतर अपक्षांनी ४८ जागा जिंकल्या आहेत. अजूनही मतमोजणी सुरू आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या