22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रमहायुती सरकारने शब्द पाळला : उपमुख्यमंत्री फडणवीस

महायुती सरकारने शब्द पाळला : उपमुख्यमंत्री फडणवीस

एकमत ऑनलाईन

मुंबई : ओबीसी राजकीय आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला. सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणे हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवार दि. २० जुलै रोजी झालेल्या सुनावणीत बांठिया आयोगानुसार निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली आहे.

दोन आठवड्यात निवडणुका जाहीर करा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे की, ओबीसी राजकीय आरक्षणाचा आमच्या महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला. महाविकास आघाडी सरकारने १५ महिने अहवाल रखडवला. सर्वोच्च न्यायालयातून ओबीसी राजकीय आरक्षणाला मान्यता मिळणे हा संपूर्ण ओबीसी समाजाचा विजय आहे. ओबीसी कल्याण, बहुजन कल्याण, गरिब कल्याण हाच आमचा अजेंडा होता, आहे आणि राहील. ओबीसी राजकीय आरक्षण प्राप्त करुन देण्याच्या प्रक्रियेतील सहभागी सर्वांचे मन:पूर्वक आभार!

आरक्षणासाठी ठाकरे-पवार सरकार जावे लागले
ओबीसी आरक्षण हिरावलेले होते. तो मार्ग आज मोकळा झाल्याचं वाटत आहे. मोठा दिलासा मिळाला आहे. गेली अडीच वर्षे आम्ही लढत होतो. यासाठी उद्धव ठाकरे आणि अजित पवार सरकार जावं लागले असे भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या