20.1 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeमनोरंजनरेड कार्पेटवर मिस्टर अँड मिसेस राजामौलींची ग्रँड एंट्री

रेड कार्पेटवर मिस्टर अँड मिसेस राजामौलींची ग्रँड एंट्री

एकमत ऑनलाईन

‘ नाटू नाटू’ गाण्यासाठी मिळाला ‘गोल्डन ग्लोब’

नवी दिल्ली : जगभरामध्ये राजामौली यांच्या ‘आरआरआर’ वर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. नाटू नाटू गाण्यानं केलेली कमाल आणि त्याला मिळालेला ‘गोल्डन ग्लोब’ यामुळे ऑस्कर फार काही लांब नाही. अशा प्रतिक्रिया राजामौली यांना मिळताना दिसत आहे.

गोल्डन ग्लोबसाठी ‘आरआरआर’चे दिग्दर्शक सपत्नीक पोहचले होते. त्यावेळी त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेटक-यांच्या वेगवेगळ्या कमेंट्स मिळताना दिसत आहे. आता फक्त ऑस्कर मिळण्याची प्रतिक्षा आहे. असेही काही नेटक-यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर एस एस राजामौली आणि त्यांच्या पत्नीचा फोटो व्हायरल झाला आहे. तो फोटो पाहताच चाहत्यांनी त्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. एकानं तर तुम्ही दोघेही किती साधे आहात, तुमच्या चित्रपटाला ऑस्कर मिळणार हे नक्की. आम्हा सर्व चाहत्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. असं म्हटलं आहे.

तुम्ही परदेशात देखील भारतीय परंपरा आणि संस्कृती जपली आहे. त्याबद्दल तुमचे कौतूक. आणि ‘आरआरआर’ला मनपूर्वक शुभेच्छा ऑस्करच्या शर्यतीत असणा-या आपल्या चित्रपटाला तो पुरस्कार मिळेल यात शंकाच नाही. अशा शब्दांत चाहत्यांनी राजामौली यांना पाठींबा दर्शवला आहे.

एस एस राजामौली हे त्यांच्या भव्य दिव्य चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक आहेत. त्यांच्या यापूर्वीच्या बाहुबली चित्रपटानं देखील जगभरातून मोठी कमाई केली होती. त्यानंतर आलेल्या ‘आरआरआर’नं देखील आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता तर ऑस्करमध्ये या चित्रपटाची वर्णी लागल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

राजामौली यांच्या आरआरअर चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला गोल्डन ग्लोब मिळाले आहे. त्याची जगभर चर्चाही आहे. आता तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनी आरआरआरÞला ऑस्कर मिळावा यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे.

आरआरआरने परदेशी चित्रपट आणि ओरिजनल साँग या कॅटगिरीमध्ये ऑस्करच्या यादीत स्थान मिळवले आहे. यंदा भारताचे पाच चित्रपट ऑस्करच्या वेगवेगळया कॅटगिरीसाठी शॉर्टलिस्ट आहे. यासगळ्यात कुणाच्या पारड्यात ऑस्कर येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या