24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयउत्तर प्रदेशात नवीन मदरशांचे अनुदान रद्द

उत्तर प्रदेशात नवीन मदरशांचे अनुदान रद्द

एकमत ऑनलाईन

लखनौ : उत्तर प्रदेशात मशिदी किंवा इतर धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता राज्यातील मदरशांबाबत योगी सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील कुठल्याही नवीन मदरशांना सरकारी अनुदान मिळणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश सरकार यापुढे राज्यातील कोणत्याही नवीन मदरशाला अनुदान देणार नाही. मंगळवारी झालेल्या योगी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मागील अखिलेश सरकारचा निर्णय रद्द करत हा नवीन निर्णय घेण्यात आला. अखिलेश यादव सरकारने अनुदान यादीत समाविष्ट केलेल्या १४६ पैकी १०० मदरशांना अनुदान सुरू केले होते.

यूपीत ५६० अनुदानित मदरसे
आता या नवीन निर्णयाबाबत अल्पसंख्याक कल्याण आणि वक्फ मंत्री धरमपाल सिंह म्हणाले की, हे मदरसे दर्जाहिन आहेत. त्यात योग्य सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांना अनुदान मिळू शकत नाही. आता हे धोरण मंत्रिमंडळात रद्द करण्यात आल्यामुळे अनुदानाच्या यादीत कोणत्याही नवीन मदरशाचा समावेश होणार नाही. विशेष म्हणजे, सध्या यूपीमध्ये ५६० मदरशांना अनुदान मिळत आहे. या अंतर्गत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन व भत्ते समाविष्ट आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या