23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeसरसेनापती हंबीरराव चित्रपटाचे ४ हजार स्क्वेअर फुटांमध्ये ग्रास पेंटिंग

सरसेनापती हंबीरराव चित्रपटाचे ४ हजार स्क्वेअर फुटांमध्ये ग्रास पेंटिंग

एकमत ऑनलाईन

कळंब : लॉकडाउनमधे अडकलेल्या तालुक्यातील इटकूर येथील अभयसिंह आडसुळ या युवकाने गावातील कला शिक्षकांच्या मदतीने पॅडी आर्टच्या माध्यमातुन विठ्ठल तरडे लिखीत दिग्दर्शित प्रदर्शित होणा-या सरसेनापती हंबीरराव या ऐतीहासीक मराठी चित्रपटाचे चार हजार स्वेअर फुटमध्ये ग्रास पेटींग साकारली आहे. आपल्या मित्रांच्या चित्रपटाला प्रसिध्दी मिळावी व सरसेनापतीचा इतिहास युवकांसमोर यावा म्हणून ही दर्जेदार कलाकृती मेहनतीने तयार केली असून पाहण्यासाठी अनेक जण जात आहेत.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक मावळ्यांनी स्वराज्य उभारणीत हातभार लावलेला आहे. अशा अतुलनीय पराक्रम केलेल्या मावळ्यांचा इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा यासाठी पुणे येथील काही मंडळीनी पुढाकार घेतला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे हंबीरराव मोहिते यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास प्रविण तरडे यांच्या सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांनी आपल्या उर्विता प्रॉडक्शनच्या माध्यमातून अभिनेते प्रविण तरडे यांची कथा, पटकथा, संवाद व दिग्दर्शन असलेला सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट रूपेरी लवकरच पडद्यावर येणार आहे. या चित्रपटाची तयारी अंतीम टप्यात आहे.

ईटकुर येथील अभयसिंह आडसूळ यांचे या संदीप मोहिते यांच्यासह सर्व मंडळीचे स्नेहाचे संबंध आहेत. मात्र ईटकुर येथील अभयसिंह आडसूळ हा युवक लॉकडाऊन काळात गावी अडकला आहे. या वेळात आपल्या आवडत्या शिवकालीन योद्ध्यांचे चित्र ग्रास पेटींग या आधुनिक कलाप्रकारातून साकारण्याची कल्पना मनात आली. त्यांनी इटकूर येथील रहिवाशी व सद्या वाशी तालुक्यातील पिंपळगाव को येथील वसंत विद्यालय येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कुंडलीत राक्षे यांनी सांगितली. यानुसार अभयसिंह आडसूळ, कुंडलिक राक्षे व अक्षय पोते यांनी यासाठी अभयqसह आडसुळ यांच्या शेतीतील एका जमिनिच्या क्षेत्रावर पेरणीपूर्व मशागत केली. यानंतर साकार करावयाच्या प्रतिकृतीचे त्या जमिनीवर रेखांकन केले. यावर पंधरा दिवसापुर्वी गव्हाच्या बियाणाची पेरणी केली. यामुळेच दुसèयाच आठवड्यात सरसेनापती हंबीरराव मोहीते यांच्या नावानिशी ग्रास पेंटीग असलेली ही कलाकृती तयार झाली.

अभयसिंह आडसुळ व कुंडलिक राक्षे यांनी ९५ फूट भाय ४० फूट या आकारात प्रथम जमिनिची मशागत केली. यानंतर सरसेनापती हंबीरराव चित्रपटाच्या पोस्टची हुबेहुब प्रतिकृती साकार व्हावी, यासाठी ग्राफिक्स रेखांकन करण्यात आले. यांच्या आऊटलाईन खोदण्यात आले. यामध्ये ५० किलो गव्हाच्या बियांणाची पेरणी करण्यात आली. यातून पुढे चार हजार स्क्वेअर फुटावरील ही लक्षवेधी चित्रकृती साकार झाली आहे.

मी गव्हाच्या कापणीला येईन : विठ्ठल तरडे
अभयसिंह आडसुळ यांच्या विचारातुन कुंडलीक राक्षे या दोघांनी खुप मेहनतीतुन सरसेनापती हंबीरराव हे पॅडी आर्टच्या माध्यमातुन तयार केले मी कुंडलीक तुला ओळखत नाही. पण तुझ्या शेतात गव्हाच्या कापणीला नक्की येईल, असे विठ्ठल तरडे यांनी भावनिक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या