24.4 C
Latur
Friday, February 26, 2021
Home क्राइम भाविकांमध्ये मोठी खळबळ: नांदेड जिल्ह्यात बाल तपस्वींची निर्घृण हत्या!

भाविकांमध्ये मोठी खळबळ: नांदेड जिल्ह्यात बाल तपस्वींची निर्घृण हत्या!

एकमत ऑनलाईन

माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला…

नांदेड: उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची रात्री दीड वाजताच्या दरम्यान निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला, आणि त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या केली.

महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारील लोक जागे झाले म्हणून या आरोपीने पळ काढला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. लगेच महाराजांचे प्रेत उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून याठिकाणी भाविकांना ही माहिती समजताच एकच खळबळ माजली.

Read More  सिनेअभिनेते किरण कुमार यांना कोरोनाची लागण

बाथरूममध्ये आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला

ज्या मठात शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला, त्याच मठातील बाथरूममध्ये आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. भगवान शिंदे रा.चिंचाळा ता. उमरी असे मयताचे नाव असल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी उमरी पोलिस रवाना झाले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे. पालघर मध्ये दोन साधूंची जमावाकडून हत्या झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात माथेफिरू कडून बाल तपस्वींची हत्या झाल्याने या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या