22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeक्रीडाभारत-पाकमध्ये पुन्हा महामुकाबला

भारत-पाकमध्ये पुन्हा महामुकाबला

एकमत ऑनलाईन

दोन्ही संघ रविवारी भिडणार, हॉंगकॉंगला ३८ धावांत गुंडाळले
दुबई : बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघाने आशिया कप २०२२ मध्ये हाँगकाँगचा १५५ धावांनी पराभव करून सुपर-४ मध्ये प्रवेश केला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत १९३ धावा केल्या होत्या, उत्तरादाखल हाँगकाँगला फक्त ३८ धावा करता आल्या.

स्पर्धेत अफगाणिस्तान, भारत आणि श्रीलंका यांनी याआधीच सुपर-४ मध्ये स्थान मिळवले आहे. आता यात पाकिस्तानचादेखील समावेश झाला आहे. आशिया कपच्या ग्रुप ए मधील सामन्यात पाकिस्तानने हाँगकाँगला ३८ धावात गुंडाळात सुपर ४ मध्ये प्रवेश केला. पाकिस्तानने सामना तब्बल १५५ धावांनी जिंकला. पाकिस्तानने हाँगकाँगसमोर १९४ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हाँगकाँगचा संपूर्ण संघ १०.४ षटकांत ३८ धावात गारद झाला.

पाकिस्तानच्या आजच्या विजयामुळे क्रिकेट चाहत्यांना एका आठवड्यात पुन्हा एकदा भारत विरुद्ध पाकिस्तान ही हायव्होल्टेज मॅच पाहता येणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्ट्रेडियमवर गेल्या रविवारी या दोन्ही संघात लढत झाली होती. आता या रविवारी म्हणजेच ४ सप्टेंबर रोजी पुन्हा त्याच मैदानावर दोन्ही संघ भिडणार आहेत.

गेल्या रविवारी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेटनी पराभव केला होता. आता या रविवारी जेव्हा भारत मैदानात उतरेल, तेव्हा रविंद्र जडेजा संघात नसेल. दुखापतीमुळे आशिया कपच्या उर्वरित लढतीसाठी तो मुकणार आहे. बीसीसीआयने जडेजाच्या जागी अक्षर पटेलचा संघात समावेश केला आहे.

सुपर-४ चे वेळापत्रक
दि. लढत मैदान
३ सप्टेंबर : श्रीलंका-अफगाणिस्तान, शारजाह
४ सप्टेंबर : भारत-पाकिस्तान, दुबई
६ सप्टेंबर : भारत-श्रीलंका, दुबई
७ सप्टेंबर : पाकिस्तान-अफगाणिस्तान, दुबई
८ सप्टेंबर : भारत-अफगाणिस्तान, दुबई
९ सप्टेंबर : श्रीलंका-पाकिस्तान, दुबई
११ सप्टेंबर : अंतिम लढत, दुबई

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या