24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयआझम खान यांना मोठा दिलासा

आझम खान यांना मोठा दिलासा

एकमत ऑनलाईन

लखनौ : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूरच्या कोतवाली पोलिस स्टेशनशी संबंधित एका प्रकरणात त्यांना हा दिलासा मिळाला आहे. प्रलंबित प्रकरणांमध्ये कनिष्ठ न्यायालयातून नियमित जामीन घेण्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. त्याशिवाय नियमित जामीन मिळेपर्यंत अंतरिम जामीन सुरू राहणार आहे.

आझम खान ८० हून अधिक प्रकरणांमध्ये गेल्या २६ महिन्यांपासून सीतापूर कारागृहात बंद आहेत. आझम खान यांना ट्रायल कोर्टातून आतापर्यंत ८८ केसेसमध्ये जामीन मिळाला आहे, मात्र ८९ व्या केसमध्ये जामिनासाठी खटला सुरू होण्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने कलम १४२ चा वापर करून जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील कोतवाली पोलिस ठाण्यातील एका प्रकरणात आझम खान यांच्या अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. तसेच उत्तर प्रदेश सरकारने आझम खान यांच्या जमानत याचिकेला विरोध करत, जमीन बळकावणारा आणि गुन्हेगार म्हणून संबोधले होते.

अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून जामीन
अलाहाबाद उच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात जमीन चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतल्याच्या प्रकरणात आझम खान यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. सध्या आझम खान यांना रामपूरच्या कोतवालीशी संबंधित आणखी एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. आझम खान यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांसाठी ते फेब्रुवारी २०२० पासून सीतापूर कारागृहात बंद आहेत.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या