मुंबई : आयपीएल २०२२ मधील आजच्या दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा बटलर नावाचं वादळ मैदानात पाहायला मिळाले. बटलरने यंदाच्या हंगमातील तिसरे शतक झळकावले आहे. त्यामुळे राजस्थानने २२३ धावांचे लक्ष्य दिल्ली कॅपिटल्सला दिले आहे.
सामन्यात आधी बटलर-पडिक्कलच्या दमदार भागिदारी नंतर अखेर संजूच्या फिनिशिंगने राजस्थानला एक मोठे आव्हान देण्यास मदत केली. राजस्थानकडून बटलरने शतक, पडिक्कलने अर्धशतक आणि संजूने नाबाद ४६ धावांची खेळी केली.