28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeक्रीडाआयसीसीच्या अध्यक्षपदी पुन्हा ग्रेगर बार्कले

आयसीसीच्या अध्यक्षपदी पुन्हा ग्रेगर बार्कले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला नवे अध्यक्ष मिळाले आहेत. न्यूझीलंडचे क्रिकेट प्रशासक आणि वकील ग्रेगर बार्कले पुन्हा एकदा आयसीसीचे अध्यक्ष बनले आहेत. शनिवारी त्यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांची सलग दुसऱ्यांदा या पदावर निवड झाली आहे. त्याचबरोबर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना आर्थिक समितीचे प्रमुख बनवण्यात आले आहे.

तवेंगवा मुकुहलानी यांचे नाव मागे घेतल्याने या पदासाठी निवड प्रक्रिया बिनविरोध झाली. पुढील दोन वर्षे ते या पदावर राहतील. बार्कलेने दुसरी टर्म न मागता पायउतार झाल्यास आयसीसीला नवीन अध्यक्ष मिळेल, असा विश्वास होता. पण, बार्कले यांनी त्यांची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

ऑकलंडचे व्यावसायिक वकील बार्कले नोव्हेंबर २०२०२ मध्ये प्रथमच आयसीसीचे अध्यक्ष बनले. ते न्यूझीलंड क्रिकेटचे अध्यक्षही होते. त्यांना २०१५ च्या वनडे विश्वचषकाचे संचालक देखील बनवण्यात आले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या