24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeआंतरराष्ट्रीयवाढती कट्टरता जगासाठी नवे आव्हान

वाढती कट्टरता जगासाठी नवे आव्हान

एकमत ऑनलाईन

दुशांबे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफगाणिस्तानातील तालिबानच्या ताब्यावर भाष्य करत कट्टरतावादी शक्तींना रोखण्याची जगाला गरज असल्याचे म्हटले आहे. शांघाई सहयोग संघटन म्हणजेच एससीओ संमेलन पंतप्रधान मोदी बोलत होते. अफगाणिस्तानात घडलेली ताजी घटना ही कट्टरतावाद किती मोठे आव्हान आहे हे स्पष्ट करते, त्यामुळे कट्टरतावादाविरोधातील लढाई ही केवळ क्षेत्रिय सुरक्षेसाठीच नाही तर तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठीही गरजेची असल्याचे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संमेलनात नव्याने सहभागी झालेल्या ईराणचे स्वागत केले. मोदी म्हणाले, यंदा एससीओचे २० वे वर्ष आहे, आनंदाची गोष्टी ही आहे की या चांगल्या मुहूर्तावर आपल्यासोबत नवीन मित्र आले आहेत. मी ईराणचे नवीन मित्राच्या रुपाने स्वागत करतो. मी तिन्ही नवीन डायलॉग पार्टनर सउदी अरब, इजिप्त आणि कतरचेही स्वागत करतो. पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात, उदारतावादी, सहिष्णु मुस्लिमांचा उल्लेख केला.

ते म्हणाले की, एससीओने इस्लामशी निगडीत उतारवादी, सहिष्णू आणि सर्वसमावेशी संस्था आणि परंपरांना मजबूत करण्यासाठी काम करायला हवे. भारतासह सर्वच इस्लामिक देशांमध्ये उदारतावादी, सहिष्णू आणि सर्वसमावेशी संस्थाने आणि परंपरा आहेत. एससीओला या सर्वांमध्ये एक मजबूत नेटवर्क बनवण्याची गरज आहे.

मध्य आशिया हा उदारतावादी
मोदी पुढे म्हणाले की, इतिहासावर नजर टाकली, तर मध्य आशिया हा उदारतावादी आणि प्रगतीशील संस्कृती आणि मुल्यांचे माहेरघर राहिला आहे. सूफीवादासारखी परंपरा इथे शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. आणि हाच आपला वारसा आपल्याला जगामध्ये पसरवायचा आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या