22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeउद्योगजगतजीएसटी कौन्सिलची आज बैठक, वादळी ठरण्याची शक्यता

जीएसटी कौन्सिलची आज बैठक, वादळी ठरण्याची शक्यता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जीएसटी कौन्सिलची आज दिल्लीत बैठक होणार असून या बैठकीत अनेक गैर भाजप शासित राज्ये केंद्र सरकारने नुकसान भरपाईसाठी जो कर्ज घेण्याचा पर्याय राज्यांना दिला आहे त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ही बैठक वादळी ठरेल अशी शक्‍यता आहे.

केंद्र सरकारकडे पैसे नसल्याने त्यांनी जीएसटीची राज्यांना नुकसानभरपाई देण्यास असर्मथता दर्शवली आहे. नुकसानभरपाईच्या रकमेएवढे कर्ज घ्यावे असा पर्याय केंद्र सरकारने राज्यांना सुचवला आहे. पण कर्ज घेण्यास बहुतेक राज्यांचा विरोध आहे. ही नुकसानभरपाई केंद्रानेच दिली पाहिजे अशी राज्यांची मागणी आहे.

त्यावर या बैठकीत विचारविनीमय होईल. यावर्षी आत्तापर्यंत जीएसटी कलेक्‍शन मध्ये राज्यांना सुमारे 97 हजार कोटी रूपयांची तूट आली आहे. ही तूट कर्जातून भरून काढण्याच्या प्रस्तावाला 21 राज्यांनी संमती दिली असली तरी केरळ, पंजाब आणि पश्‍चिम बंगाल आदि राज्यांनी कर्जाच्या प्रस्तावाला सक्त विरोध दर्शवला आहे.

राज्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी केंद्र सरकारने काहीं ऐषो आरामी सेवा व वस्तुंवर जादाचा सेस लाऊन कर वसुली केली आहे. पण त्यातील सुमारे 68 हजार कोटी रूपये केंद्र सरकारने परस्पर दुसरीकडे वळवले आहेत असा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आला आहे.तो विषयही या बैठकीत गाजण्याची शक्‍यता आहे.

‘डबल हेडर’मध्ये दिल्ली आणि बंगळुरू विजयी

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या