24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपालकमंत्री चव्हाण उपचारांसाठी अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना

पालकमंत्री चव्हाण उपचारांसाठी अ‍ॅम्ब्युलन्सने मुंबईला रवाना

एकमत ऑनलाईन

नांदेड:प्रतिनिधी
कॉगे्रसचे जेष्ठ नेते तथा नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना पुढील उपचारासाठी सोमवारी सकाळी नांदेडहून विमानाने मुंबईला नेण्याचे प्रयत्न करण्यात आले़मात्र विमानाला परवानगी न मिळाल्याने पालकमंत्री सकळी साडे अकराच्या सुमारास चक्क अ‍ॅम्बुलन्सने नांदेडहून मुंबईकडे रवाना झाले़ पालकमंत्री चव्हाण यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आघाडी सरकारमध्ये बांधकाम मंत्री व नांदेडचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांनी व त्यांच्या कुटुंबाने पुढील उपचारासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कळवला.

Read More  सुधारणा म्हणजे कामगार कायद्यांचे उच्चाटन नव्हे!

मुख्यमंत्र्यांनीही ना.चव्हाण यांना नांदेडहून एअरलिफ्ट करून मुंबईला आणण्याचे आदेश प्रशासनाला दिले अशी चर्चा होती मात्र विमानाला परवानगी न मिळाल्याने पालकमंत्री चव्हाण सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अ‍ॅम्बुलन्सने नांदेडहून मुंबईला रवाना झाले. नांदेड ते मुंबई हे अंतर ५७३ किलोमीटर आहे. रस्ते मार्गे नांदेडहून मुंबईला पोहोचण्यासाठी साधारणत: ११ ते साडेआकरा तास लागणार आहेत. यामुळे मुंबईत पोहोचायला मध्यरात्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची प्रकृती सध्या स्थिर असून मुंबईकडे रवाना होतांना त्यांनी उपस्थित लोकांना हात उंचावून काळजी करू नका मी लवकरच बरा होईल असा विश्वास व्यक्त केला़

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या