औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई हे उद्या 30 मे रोजी औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
सकाळी 10 वाजता त्यांचे औरंगाबादमध्ये आगमन होणार असून 10 वाजून 15 मिनिटाला ते मेल्ट्रॉन, चिकलठाणा येथे एमआयडीसी तर्फे बांधण्यात येणारे कोविड-19 हॉस्पिटलला भेट देणार आहे. त्यानंतर 10.30 वाजता ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे असलेल्या कोविड-19 टेस्टिंग आणि रिसर्च फॅसिलिटी केंद्राला भेट देणार आहे.
तसेच 11 वाजता जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई एक बैठक घेणार आहे. दरम्यान ही बैठक संपल्यानंतर दुपारी 2 वाजता पालकमंत्री मुंबईकडे प्रयाण करणार असल्याची माहिती आहे.
Read More ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग