24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रगनिमी काव्याने घेणार दसरा मेळावा ; शिवसेनेचे ओपन चॅलेंज

गनिमी काव्याने घेणार दसरा मेळावा ; शिवसेनेचे ओपन चॅलेंज

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांनाही मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली आहे. यावर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर तसेच शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून शिवसेनेचा दसरा मेळावा गनिमी काव्याने शिवतीर्थावरच होणार असे सांगत शिंदे गटाला आव्हान केले आहे.

तर पेडणेकर यांनी शिंदे गट रडीचा डाव खेळत आहे, हा डाव भाजपाच्या माध्यमातून खेळला जातोय अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, मुंबई पालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क दसरा मेळाव्याला कुणालाच मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे

मुंबई महापालिकेने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेची आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा गनिमी काव्याने शिवतीर्थावरच होणार, असे सांगत शिंदे गटाला आव्हान केले आहे, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि अजय चौधरी यांनी म्हटले आहे.

शिंदे गट सध्या भाजपचीच स्क्रिप्ट वाचतोय
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, शिंदे गटाला बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये परवानगी मिळालेली असतानाही शिवाजी पार्कसाठी परवानगी मागत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना मानायचं मात्र शिवसेनेची गळचेपी करायची, पक्षातील दलबदलू लोकं आज आमदार-खासदार झाले, ते बाळासाहेबांचे विचार काय पुढे नेणार? शिंदे गट सध्या भाजपचीच स्क्रिप्ट वाचतोय.

शिवाजी पार्क कुणाचेच नाही
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेकडून कोणालाच दिली जाणार नाही. शांतता आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून परवानगी नाकारली असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. महापालिकेकडून शिवसेना आणि शिंदे गट यांना परवानगी नाकारल्याचे पत्र पाठवण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या