22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeराष्ट्रीयग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणाबाबत मार्गदर्शक सूचना

ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणाबाबत मार्गदर्शक सूचना

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुस-या लाटेत ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ग्रामीण भागासाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. समुदायाला सक्षम करणे आणि सर्व स्तरावरील आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

ग्राम स्वच्छता, ग्राम आरोग्य यांबाबत लक्ष द्यावे, पोषण समितीच्या मदतीने वेळोवेळी इन्फ्लूएंजासारखे आजार, गंभीर श्वसन संक्रमणासाठी विशेष काळजी घ्यावी, कोरोनाची लक्षणे असलेल्या प्रत्येकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घ्यावे पण, कोविड रिपोर्ट येईपर्यंत अशा लोकांना वेगळया ठिकाणी ठेवण्यात यावे, अशा सूचनाही सरकारने दिल्या आहेत.

सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे मदतीने टेली- कन्सल्टेशन करावे. गंभीर लक्षणे किंवा ऑक्सिजन लेव्हल कमी असणा-या रुग्णांना मोठ्या सेंटरमध्ये पाठवावे, असेही म्हटले आहे. परिस्थितीनुसार, कॉन्टक्ट ट्रेसिंग करावे. तसेच उऌड२ आणि अठट ना रॅपिड अँटिजन टेस्ंिटग करण्याचे प्रशिक्षण द्यावे. प्रत्येक गावाकडे पुरेसे पल्स ऑक्सिमिटर आणि थर्मोमिटर असतील याची काळजी घ्यावी, आशा सेविका, अंगणवाडी सेविकेच्या मदतीने याचा वापर केला जावा. वापरानंतर याचे सॅनिटायझेशन केले जावे,आदी सुचनांचाही यात समावेश आहे.

ग्रामीण भागांतील नागरिकांना चाचणी, लसीकरण केंद्रे, डॉक्टर, बेड याबद्दल माहिती देण्यासाठी पंचायत कार्यालये, शाळा, सामान्य सेवा केंद्रे यांचा वापर करून घेण्यात यावा. लक्षणे नसलेले जास्तीत जास्त रुग्ण राहू शकतात, अशा घरांना विलगीकरण स्थान करता येईल. याव्यतिरिक्त गरजू आणि अन्य राज्य, स्थलांतरित मजुरांसाठी विशिष्ट विलगीकरण केंद्रे देखील पंचायती स्थापन करू शकतात. आरोग्य विभागाच्या मदतीने पात्र लोकसंख्येचे लसीकरण करण्यासाठी पंचायतींना नियुक्त केले जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.

गरजुंना सर्व सुविधा द्या
गरजूंना ग्रामीण स्तरावर मदत व शिधा, पेयजल पुरवठा, स्वच्छता, मनरेगाअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, असे निर्देश पंचायती राज मंत्रालयाने विविध राज्यांना दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रालयाने राज्य सरकारला जवळच्या जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय सुविधांशी योग्य समन्वय स्थापित करायला सांगितला आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, चाचणी आणि उपचार आदी सुविधा गरजूंना उपलब्ध होऊ शकतील, असे सांगितले आहे.

स्पुटनिक व्ही ची दुसरी खेप हैदराबादमध्ये दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या