Saturday, September 23, 2023

गुजरात- 44 नवजात अर्भकांना कोरोनाची लागण

अहमदाबाद : गुजरातमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं चित्र आहे. अहमदाबाद येथील रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या 44 अर्भकांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अहमदाबाद येथील जवळपास पाच रुग्णालयांमध्ये 172 गर्भवती महिला प्रसूत झाल्या आहेत. यांपैकी 44 अर्भके जन्मजात कोरोना संक्रमित झाली आहेत. या रुग्णालयांमध्ये सिविल हॉस्पिटल, एसव्हीपी, सोला सिव्हील, शारदाबेन आणि एलजी हॉस्पिटलचा समावेश आहे. यापूर्वीही जवळपास 90 महिलांची प्रसूती या रुग्णालयात करण्यात आली आहे. त्यापैकी फक्त 30 टक्के अर्भके कोरोना संक्रमित होती. मात्र, तो आकडा आता वाढला आहे.

Read More  अमित शहांचा कबुलीनामा; मरकज रोखला असता तर ही वेळच आली नसती

कोरोनाचा मुकाबला गर्भवती खूप उत्तम करत असल्याचंही इथल्या स्थानिक रुग्णालयांच्या स्त्रीरोगतज्तज्ञांचं म्हणणं आहे. गरोदरपणात त्यांचा आहार आणि इतर औषधे वेळेवर मिळाल्यामुळे त्यांना श्वसनासाठी लागलेली मदत वगळता प्रकृती उत्तम असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. यातील अनेक महिला या 20 ते 30 वयोगटातील आहेत. त्यांना इतर कोणतेही विकार नाहीत. त्यामुळे गरोदर महिलांद्वारे त्यांच्या बाळांना होणाऱ्या संक्रमणावर अभ्यास होणं गरजेचं आहे, असंही मत इथल्या वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या