26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeराष्ट्रीयगुजरात निवडणुकीचा बिगुल वाजला; दोन टप्प्यांत होणार मतदान

गुजरात निवडणुकीचा बिगुल वाजला; दोन टप्प्यांत होणार मतदान

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक होणार असून १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे. ४.९ कोटी मतदार गुजरातमधील नव्या सरकारसाठी मतदान करणार आहेत. गुजरात विधानसभेत १८२ जागा आहेत. पहिल्या टप्प्यात ८९ आणि दुस-या टप्प्यात ९३ जागांवर निवडणूक होणार आहे.

५० टक्के मतदान केंद्रांचे थेट प्रसारण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. ५१,७८२ मतदान केंद्र असून प्रत्येक बूथमध्ये सरासरी ९४८ मतदार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ३.२४ लाख मतदार पहिल्यांदा मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.

असा असणार निवडणुकीचा कार्यक्रम
> >  नोटिफिकेशन : पहिल्या टप्प्यासाठी – ५ नोव्हेंबर २०२२
दुस-या टप्प्यासाठी- १० नोव्हेंबर २०२२

> >  अर्ज दाखल करण्याची तारीख :

पहिल्या टप्प्यासाठी -५ नोव्हेंबर २०२२
दुस-या टप्प्यासाठी- १० नोव्हेंबर २०२२

> >  अर्ज माघारीची शेवटची तारीख

पहिल्या टप्प्यासाठी – १७ नोव्हेंबर २०२२
दुस-या टप्प्यासाठी- २१ नोव्हेंबर २०२२

गुजरात निवडणुकीची वैशिष्ट्ये :
>  कोरोनाबाधितांसाठी घरातून मतदान करण्याची व्यवस्था

>  गिर जंगलात फक्त एका मतदारासाठी मतदान केंद्र असणार

>  ९.८७ मतदार ८० वर्षांवरील

>  ४.६ लाख युवा मतदार

>  दिव्यांगांसाठी १८२ विशेष मतदान केंद्र असणार

>  गुजरातमध्ये ४ लाख ४ हजार दिव्यांग मतदार

>  १४२ आदर्श मतदान केंद्रे तयार करण्यात आली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या