26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रगुलाबरावांनी आपल्या फायद्यासाठी आजोबा बदलले

गुलाबरावांनी आपल्या फायद्यासाठी आजोबा बदलले

एकमत ऑनलाईन

भंडारा : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटलांवर टीकास्त्र सोडले आहे. गुलाबराव पाटलांनी आपल्या फायद्यासाठी आजोबा बदलले, अशा आशयाची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरूनही त्यांनी गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला आहे. ते भंडा-यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

गुलाबराव पाटलांवर टीकास्त्र सोडताना अंबादास दानवे म्हणाले की, तुम्ही जर हिंदुत्वाविषयी बोलत असाल तर परवा सांगलीमध्ये साधूंवर हल्ले कसे झाले? तुमचं नेमकं हिंदुत्व काय आहे? शेतक-यांना अतिवृष्टीच्या वेळी मदत न करणे, हे तुमचे हिंदुत्व आहे. राज्यात ज्या आत्महत्या होतात, त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे तुमचे हिंदुत्व आहे. प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलेले हिंदुत्व हे नाही. प्रबोधनकारांनी सर्वसामान्य माणसाची सेवा करणे हेच खरे हिंदुत्व असल्याचे सांगितले आहे.

तुम्ही यापूर्वीची गुलाबराव पाटलांची भाषणे नीट ऐका. त्यांना शिवतीर्थावर भाषण करायला संधी दिली होती. त्यावेळी गुलाबराव पाटील स्वत: शिवसेनेमध्ये या, बाळासाहेब ठाकरेंकडे या, उद्धव ठाकरेंकडे या असे म्हणत होते. मात्र, आता त्यांनी बंडखोरी केली आहे. गद्दारी केली आहे. यामुळे त्यांनी आपला आजोबाही बदलला. एकनाथ शिंदे हे त्यांचे आजोबा झाले आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या