27 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रन्यायालयाचा टीईटी घोटाळ्यातील याचिकाकर्त्या शिक्षकांना दिलासा

न्यायालयाचा टीईटी घोटाळ्यातील याचिकाकर्त्या शिक्षकांना दिलासा

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळा प्रकरणी राज्य शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या घोटाळ्यातील शिक्षकांचे वेतन थांबवण्याचे सरकारने ठरवले होते, तसेच याची यादी देखील प्रसिद्ध केली होती. पण याविरोधात काही शिक्षकांनी मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.

या अनेक याचिकांवर आज खंडपीठात एकत्रित सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने म्हटले की, शिक्षकांचे वेतन थांबवणे हा त्यांच्या कुटुंबियांवर अन्याय करणे आहे. त्याचबरोबर येत्या काळात दिवाळीचा सणवार असणार आहे. तसेच या घोटाळ्याबाबत शासनाकडून अद्याप स्पष्टता दिसत नाही, असे सांगत या शिक्षकांची वेतनवाढ रोखू शकता पण वेतन थांबवू नका असे कोर्टाने म्हटले आहे. यानंतर आता शासकीय वकिलांनी युक्तिवादासाठी पुढची वेळ मागितली आहे. त्यामुळे शिक्षकांना हा अंतरिम दिलासा आहे.

हा दिलासा औरंगाबाद खंडपीठात ज्या दोनशे याचिका दाखल झाल्या आहेत, या याचिकाकर्त्या शिक्षकांनाच देण्यात आला आहे. पण त्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या