26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्र‘मी डब्बा अन् उद्धव ठाकरे माझे इंजिन’ म्हणणारे गुलाबराव पाटीलही गुवाहाटीकडे रवाना?

‘मी डब्बा अन् उद्धव ठाकरे माझे इंजिन’ म्हणणारे गुलाबराव पाटीलही गुवाहाटीकडे रवाना?

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास दोन तृतीयांश आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे वारंवार करत आहेत.

अशातच आता शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक असलेले गुलाबराव पाटीलही एकनाथ शिंदे असलेल्या आसाममधील गुवाहाटीच्या हॉटेलच्या दिशेने रवाना झाले आहेत.

त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटीलही एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. ‘मी डब्बा अन् उद्धव ठाकरे माझे इंजिन. उद्धव ठाकरे जिकडे सांगतील तिकडे मी जाईन’ असे काही दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील म्हणाले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या