21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeक्रीडागुरदीप सिंहची प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर; वेटलिफ्टिंगमध्ये जिंकले कांस्यपदक

गुरदीप सिंहची प्रतिस्पर्ध्यांना जोरदार टक्कर; वेटलिफ्टिंगमध्ये जिंकले कांस्यपदक

एकमत ऑनलाईन

 भारताची आतापर्यंत १८ पदकांवर झडप

नवी दिल्ली : कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या १०९ किलोग्रॅम वजनी गटात भारताचा गुरदीप सिंहने कांस्यपदक जिंकले आहे. दरम्यान, त्याने स्नॅचमध्ये १६७ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये २२३ किलोग्रॅम असे एकूण ३९० किलो वजन उचलून बर्मिंगहॅममध्ये भारताचा तिरंगा फडकावला. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत १८ पदकांवर झडप घातली आहे.

इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी भारताने ५ पदकांची कमाई केली.

यामध्ये चार कांस्य आणि एका रौप्यपदकाचा समावेश आहे. यासह भारताच्या एकूण पदकांची संख्या १८ वर पोहोचली आहे. ज्यात पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे. एवढेच नाही तर भारताने तीन पदकेही निश्चित केली आहेत, म्हणजेच येत्या काही दिवसांत भारताच्या पदसंख्येत आणखी वाढ होणार आहे.

भारतीय वेटलिफ्टर गुरुदीप सिंहने १०९ + किलोग्रॅम वजनी गटात कांस्यपदक जिंकले आहे. त्याने स्नॅच फेरीत तीन प्रयत्नांत १६७ किलोग्रॅम वजन उचलले. यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये २२३ किलोग्रॅम वजन उचलले. अशाप्रकारे एकूण ३९० किलो वजन उचलून त्याने कांस्यपदकावर कब्जा केला. पाकिस्तानच्या मुहम्मद नोह दस्तगीर बटने एकूण ४०५ किलोग्रॅम वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. त्याचवेळी न्यूझिलंडच्या डेव्हिड अँड्र्यूने एकूण ३९४ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले.

कॉमनवेल्थमध्ये पदक जिंकलेले भारतीय खेळाडू
सुवर्णपदक- ५ (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ.)
रौप्यपदक- ६ (संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान)
कांस्यपदक- ७ (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर)

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या